विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शारीरिक आरोग्य संपत्ती देखील संपन्न करावे:- डॉ.तोरवणे

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: तरुण पिढीवर माझा विश्वास आहे माझे कार्यकर्ते निघतील आणि देशापुढील सर्व समस्या सोडवतील असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांवर दाखविला होता असे मत डॉ.प्रीतम तोरवणे यांनी व्यक्त केले.

                  पतंजली योगपीठ, हरिद्वार साक्री विभाग व विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिन तसेच स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसंगी डॉ प्रितम तोरवणे यांनी सूर्यनमस्कार,योगासन व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक दिले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ अनंत पाटील उपस्थित होते. डॉ तोरवणे बोलताना पुढे म्हणाले की, भारतीय तरुणांना गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षण तसेच निरोगी शरीराची आवश्यकता आहे. महाविद्यालयात येऊन विद्यार्थी शिक्षण घेत असतो परंतु आपल्या शरीराकडे नकळतपणे दुर्लक्ष करतो, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शारीरिक आरोग्य देखील संपन्न करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post