साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: निजामपुर पोलीस स्टेशन च्या हद्दीत दि. ११/०१/२०२५ शनिवारी रोजी निजामपुर व जैताणे गावात आगामी मकर संक्रांतीच्या सणाच्या काळात पतंग उडविण्याकरीता प्रतिबंधीत नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणे बाबत गावात रॅली काढुन जनजागृती मोहीम काढण्यात आली. प्रतिबंधीत नायलॉन मांजा बाबत माहिती देण्यासाठी प्रतिकात्मक रुपात यमराज यांना उभे करुन त्यांच्या हस्ते नायलॉन मांजा बाळगणे, त्याचा वापर करणे, खरेदी विक्री करणे, नियमांचा भंग करणे बाबत रॅली काढुन गावात जनजागृती करण्यात आली. प्रतिकात्मक रुपातील यमराज यांच्या मार्फतीने नायलॉन मांजा बाळगणे, त्याचा वापर करणे, खरेदी विक्री करणे, नियमांचा भंग केल्यास यमाचे बोलावणे नक्की येईल अशी तंबी देखील देण्यात आली. निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मयुर एस. भामरे यांनी निजामपुर / जैताणे तसेच माळमाथा परिसरातील सर्व पतंग विक्रेते व दुकानदार व जनतेला आव्हान केले आहे की, आपले दुकानात शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करता ठेऊ नये त्यामुळे अनेक व्यक्तींना आपला जिव गमवावा लागतो तरी आपण नियमांचे पालन करावे.
सदरची जनजागृती मोहीम हि मा.श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे. मा. किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक, धुळे,मा.एस.आर.बांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी
सपोनि / श्री.मयुर एस. भामरे, पोउपनी / यशवंत भामरे, पोउपनी/मधुकर सोमासे, श्रेपोसई/प्रभाकर गवळे, असई / रुपसिंग वळवी पोहेकॉ/नारायण माळचे, पोहेकॉ / आर.यु.मोरे, पोहेकॉ / प्रदीपकुमार आखाडे, पोना / खंडेराव पवार, पोकॉ/ श्रीराम पदमर, पोकॉ/ गौतम अहिरे,पोकॉ/टिलु नायका, पोकों/ कृष्णा अशोक भिल, पोकॉ/ पृथ्वीराज शिंदे, पोकॉ/सुनिल अहिरे, पोकॉ/फुलसिंग वसावे व सोबत आर.सी.बी.पथक अशांनी राबविली.
