प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी:आज मराठी पत्रकार दिनानिमित्त दि पीपल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव शाखा कळंब यांच्याकडून तालुक्यातील पत्रकार बांधव यांचा सत्कार करण्यात आला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी 1882 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने पीपल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह लि. शाखा कळंब यांच्या वतीने कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश बाप्पा टोणगे,दै.धाराशिव नामा कळंब तालुका प्रतीनीधी रामराजे जगताप, अभय वार्ता मुख्य संपादक जय नारायण दरक,सकाळ प्रतिनिधी राजे सावंत, दै.संघर्ष शहर प्रतिनिधी शिवप्रसाद बियाणी, लोकमत प्रतिनिधी राम रतन कांबळे यांच्यासह तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सन्मान करून पेढे भरण्यात आले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत पत्रकार बंधू हे सामाजिक कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या सर्व घडामोडींचे आपल्या लेखणीच्या माध्यमातून नोंद घेत असतात व पुढे बोलताना जांभेकर यांनी दर्पण या मराठी वृत्तपत्राद्वारे देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी 1812 मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात एका सामान्य कुटुंबात झाला होता जांभेकर यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षाचे होते मात्र जांभेकर यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या विचारांचा ठेवा आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्याचा त्यांचा मोलाचा वाटा होता म्हणून आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील पत्रकार बांधव यांचा आमच्या शाखेच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला असे सत्कार समारंभ वेळी दि पिपल मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव कळंब शाखेचे व्यवस्थापक श्रीकांत दीक्षित यांनी बोलून दाखवले यानंतर पुढील वाटचालीस दीक्षित यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी शाखेचे व्यवस्थापक श्री श्रीकांत दिक्षित व इतर कर्मचारी उपस्थित होते.
