शिराढोण प्रतिनिधी/बिलाल कुरेशी:भारत माता इंग्लिश स्कूल शिराढोण येथे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती साठी प्रमुख पाहुणे म्हणून राणी जोगदंड मॅडम अध्यक्ष म्हणून प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त शाळेत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले शाळेतील मुलीने सावित्रीबाई फुले ची वेशभूषा प्रधान केली होती सावित्रीबाई फुले प्रमाणेच शिक्षणाचे काम प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे असे विचार मुलीने सावित्रीबाई फुले यांची गीत गायन करून व्यक्त केली तसेच त्यांच्याविषयी आपले विचार भाषणातून व्यक्त करण्याचे काम लहान चिमुकल्याने केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन पटा विषयी सविस्तर असे माहिती दिली सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती देत असताना राणी जोगदंड मॅडम भाऊक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती रोडे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोनिका पवार मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सध्या पाटील मॅडम यांनी केले तसेच सावित्रीबाई फुले विषयी स्वाती खिचडे रोहिणी भिसे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद मॅडम सरिता मॅडम रामेश्वर खिचडे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
