प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी:नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, रोजगारन्मुक शिक्षण, कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. ते नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ती संधी निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन शरदचंद्र महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी चे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे यांनी केले.पूढे बोलताना प्राचार्य डॉ फेरे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यातून विद्यार्थीचा सर्वांगीन विकास होईल असे वाटते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साजेद चाऊस होते. डॉ. चाऊस म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण व्यावसायिक शिक्षण आणि भाषिक विविधतेला प्रोत्साहन देते. तसेच उच्च शिक्षणातील सुधारणांचे प्रस्तावित करते, ज्यामध्ये बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आणि राष्ट्रीय संशोधनाला चालना मिळते.
कार्यक्रमाचे आयोजन आय.क्यू.ए.सी विभागाने केले . कार्यक्रमास. आय क्यू ए सी कोऑर्डिनेटर डॉ. काझी शकीलोदिन नॅक समन्वयक डॉ. प्रशांत गंभीरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ खोंड एस.व्ही आणि आभार डॉ शिरमाळे एम बी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
