बुलढाणा जिल्ह्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या जाहीर निषेध करत ; न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक नंदुरबार यांच्यामार्फत निवेदन सादर..

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /संदीप कोकणी:आज दी.06_01_2025 रोजी आम्ही जिलाधिकारी कार्यालयात आलो आहे त्याचे कारण असे कि, बुलढाना जिल्ह्यातील राजुर ताल. मोतला येथिल दैनिक जागृत मालक चे प्रतिनिधि सईद खान आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेला अमानवीय हल्ला असुन अत्यंत निंदनीय आणि गंभीर स्वरुपाचा आहे
हा हल्ला केवल एका व्यक्तिवर नसून पत्रकरितेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाही च्या मूलभूत तत्वांवर प्रहार करणारा आहे पत्रकार हा समाजाचा समस्यांना वाचा फोडणारा आणि लोकांचा हितासाठी सतत कार्यरत राहणार आधार स्तंभ आहे.अश्या परि्थितीत या प्रकारचे हल्ले केवळ त्यांच्या कामावरच नव्हे तर पत्रकारांच्या सुरक्षिततेवर ही प्रश्न निर्माण करतात.


आम्ही आज निवेदनद्वारे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत दोषींवर कठोर कार्यवाहीची मांग करत आहोत. तसेच पत्रकार श्री सईद खान व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा. यासाठी आम्ही पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते येथे एकत्र येऊन यापुढे अशा प्रकारे पत्रकार व समाजात कोणत्या ही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारची मानवी हरकत जीव घेणारे खाल्ले कोणीही करू नये त्यासाठी ठोस उपाय योजना त्वरित अमलात आणावी मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारची करतो आम्हाला ठाम विश्वास आहे की आपण या गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आवश्यक ती कार्यवाही दोशींवर करणार व पत्रकार सईंद खान व त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणार अशी आम्ही अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्र सरकारशी करतो

Post a Comment

Previous Post Next Post