नंदुरबार पालिकेचे एक्शन मोड अलर्ट,940 किलो प्लास्टिक जप्त ;03 विक्रेत्यांकडून 27 हजाराचा दंड वसूल...

 

नंदुरबार प्रतिनिधी/संदिप कोकणी:नंदुरबार येथील पालिकेमार्फत शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. नंदूरबार शहारात 31 डिसेंबर 2024 रोजी नंदुरबार नगर परिषद आरोग्य विभागाने, शहरातील मुख्य बाजारपेठ, मंगळ बाजार, सुभाष चौक, सिंधी कॉलनी, नेहरु मार्केट, तूप बाजार, गुरु नानक मार्केट या परिसरातील हातलॉरी धारक, भाजीपाला, फळ, विक्रेते, व्यापारी यांना सार्वजनिक ठिकाणी नगरपरिषदेच्या रस्त्याच्या कडेला, रस्त्यावर उघडयावर कचरा टाकु नये, या करिता आवश्यक जनजागृती करण्यात आलेली आहे, नंदुरबार शहर सुंदर शहर संकल्पना राबविण्यात येत आहे,शहरात नगरपालिके तर्फे प्लास्टीक जप्तीची मोहीम राबविण्यात येत असून प्लास्टीक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत 940 किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे. शहरातील तीन प्लॉस्टीक विक्रेत्यांकडून 27 हजार 50रुपयांचा दंड वसुल करण्यात आता आहे.


नंदुरबार नगरपालिके ने रस्त्यावर कचरा टाकणे व प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभागाने शहरातील मुख्य बाजारपेठे, मंगळबाजार, सुभाष चौक, सिंधी कॉती. नेहरु मार्केट घी बाजार, गुरुनानक मार्केटनंदुरबारात 940 किलो प्लास्टीक जप्त.या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी विक्रेत्यांना कचरा टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 12 किरकोळ विक्रेत्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या.

पालिकेच्या स्वच्छता विभाग पथकाने 940 किलो प्लास्टीक जप्त केल्याची कारवाई केली. शहरातील रवि प्लास्टीक, रवी ट्रेडर्स, साई प्लास्टीक या व्यापाऱ्यांकडून 27हजार 50 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही मोहीम पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण, अधिकारी व कर्मचारी रविंद्र काटे, किशोर वाडीले, मनोहर पिंपळे, विक्रम कोळी, एजाज इलीयास शेख, पवन माळी यांच्या पथकाने केली. प्लास्टीकचा वापर कुणीही करु नये, असे आवाहन नंदुरबार नगरपालिकेने केले आहे.यापुढे शहरात प्लास्टीक विक्री वापर साठवणुक करतांना आढळून आल्यास, त्यांचावर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करणेत येईल, यापुढेही नियमित कार्यवाही सुरु राहील, तरी व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नंदुरबार पालिकेचे परीविक्षधीन मुख्य अधिकारी डॉ. जी. व्ही एस. पवन दत्ता यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post