साक्री प्रतिनिधी/अकिल शहा
साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास पॅनलने घवघवीत यश संपादन करून सत्ता काबीज केल्याबद्दल धुळे येथे माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल व धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक शिरीष सोनवणे, उमाकांत बिरारीस, प्रदीपकुमार नांद्रे, दिनेश सोनवणे, अनिल शिंदे, राहुल अहिरराव, सुधीर अकलाडे, सजन पाटील, विजय बागुल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार पटेल यांनी शेतकी संघाच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील राहून प्रगती साधावी अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते, शिरपूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर चव्हाण, साक्री नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, उद्योजक सचिन दहिते, लक्ष्मीकांत शाह, ललितशेठ आरुजा, महीर चे सरपंच रमेशभाऊ सरक, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विजय भोसले, मालपुर चे माजी सरपंच शशिकांत भामरे, साक्री पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, बल्हाने चे माजी उपसरपंच प्रकाश बिरारीस, म्हसदी चे माजी सरपंच कुंदन देवरे, नगरसेवक दीपक वाघ, साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुकुंदराव घरटे, सामोडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश महंत, हट्टी चे किरण पदमोर, अष्टाने विकासो चे संचालक प्रवीण देवरे, उद्योजक हर्षल बिरारीस, विशाल देसले, प्रतापपूर चे माजी सरपंच धनराज गांगुर्डे, नंदू सोनवणे, आसिफ शहा, अतुल दहीते, सतीश पगार, चेतन जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
