नंदुरबार येथे ९ऑगस्ट 2023 रोजी जनआक्रोश मोर्चा काढून केंद्र सरकार आणि मणिपूर सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला..



 नंदुरबार/ प्रतिनिधी 

 दरवर्षी ९ऑगस्ट विश्व आदिवासी- मूलनिवासी गौरव दिवस मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरे केले जात होते, परन्तु या वर्षी मणिपूर मधील महिलांवरील अन्याय- अत्याचार, त्या ठिकाणी झालेला नरसंहार असोत किंवा मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवावर एका शुक्ला नावाच्या ब्राम्हणाने मूत्रविसर्जन करून तमाम आदिवासिंचा अपमान केला आहे, तसेच केंद्र सरकारने समान नागरिक कायदा (  युसीसी ) लागू करण्याचे जाहीर केले आहे. यांच्या विरोधात काल निषेध रैली जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

नंदुरबार जिल्यातून सामाजिक- राजकीय, अधिकारी, कर्मचारी सर्वच क्षेत्रातील समाज बांधव तसेच विशेष करून डॉ.बाबा साहेब आंबेडकर राईटस सर्व सामाजिक, राजकीय संघटना व मुस्लिम बांधव, महिला इ. लाखोंच्या संख्येने जन समुदाय रॅलीत सामील होऊन शेवटी मोर्चा मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन त्याचे रूपांतर सभेत होऊन उपस्थित मान्यवरांनी केंद्र सरकारला चेतावणी दिली की, जर मणिपूर मधील अन्याय-अत्याचारग्रस्त महिला आणि जनतेला न्याय नाही मिळाला तर देशातील संपूर्ण आदिवासी आणि बहुजन समाज असाज रस्त्यावर उतरून लढाई लढणार आहेत ,जे जे आदिवासींच्या संविधानीक हक्क- अधिकाराच्या विरोधात जातील त्यांना 2024 च्या निवडणुकीत यांची औकात यांना दाखवावीच लागेल असे जाहीर निर्देश देण्यात येऊन ९ लाख सह्यांची मोहीम राबवून महामहिम मा. राष्ट्रपती यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यासाठी जिल्यातून 15 ते 20 मान्यवरांचे डेलिगेशन जाण्याचे जाहीर करून मा.जिल्ह्याधिकारी सो. नंदुरबार यांना प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी बोलावून निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post