नंदुरबार! Nandurbar/SKpublicvoice
आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांच्या विकास व्हावा त्यांना दिशा मिळावी या उदांत्त हेतूने आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत वाघाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय आदिवासी कला व क्रीडा महोत्सव उद्घाटन आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार बापू चौरे होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.विजयकुमार गावित यांनी वाघाळे गावाने आणि प्रतिष्ठानने सुंदर कार्यक्रम आयोजित केला असून महोत्सवाच्या सहभागी विद्यार्थी, खेळाडू आणि कलावंत यांचे कौतुक करत महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांच्या विकास होणार असल्याचे सांगितले.
आदिवासी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हावे. फोटोग्राफी, चित्रकला, निबंध लेखन, वकृत्व स्पर्धा, व्हॉलीबॉल यासारख्या कला व क्रीडा स्पर्धांमध्ये युवकांनी सहभागी होऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्व सिद्ध करावे अशा प्रकारचे आवाहन केले.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी बापू चौरे यांनी प्रतिष्ठान राबवीत असलेले उपक्रम हे समाजाच्या विकासासाठी आणि युवा पिढीत दिशा देणारे आहेत भविष्यात प्रतिष्ठान मुळे एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळ निर्माण होईल, त्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी आपल्या मनोगतात वाघाडेकर बांधवांनी प्रतिष्ठान यांनी महोत्सव आयोजित केले, यातून आदिवासी संस्कृतीचे संवर्धन होईल यातून आदिवासी मुलांच्या कला कौशल्याचे विकास होईल असे प्रतिपादन केले. नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक यांनी महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थी व समाज एकवटला असल्याचे सांगत, यातून आदिवासी मुलांना एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन केले आहे.
याप्रसंगी मान्यवरांच्या राष्ट्रीय स्तरावर रोलबॉल-स्केटिंग खेळाडू ओम संतोष चौरे यांच्या सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी नंदुरबार पंचायत समिती सभापती माया मालचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, सरपंच सुषमा पवार, से. नि. कार्यकारी अभियंता के.टी. सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते ताराचंद मालचे, जि.प. सदस्य विश्वास बागुल, जि.प. सदस्य देवमन पवार, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, समन्वयक प्रा. मंगलदास अहिरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी वसंत चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, विकास अधिकारी राजू गायकवाड, उपसरपंच गणेश चौरे, डोंगऱ्या देव माऊली संघर्ष समिती अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, माडमाथाचे राजेंद्र पवार, वाघाळे परिसरातील लोकनियुक्त सरपंच, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुलतान पवार यांनी केले.
सूत्रसंचालन वंदना कोकणी व हसमुख चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्राम विकास अधिकारी संतोष चौरे, ग्रामसेवक प्रवीण पवार, रमेश बागुल, विक्रम महाले ,कैलास पवार, एकनाथ सूर्यवंशी, मधुकर महाले, मगन पवार,
ग्रा. प. सदस्य धनाजी गायकवाड, गिरीश गावित ,अलका पवार, भागेश्री गायकवाड, लक्ष्मण चौरे , कैकयी पवार ,सुरेश गायकवाड ,कल्पना गांगुर्डे, सखुबाई गायकवाड, हिरालाल पवार, शशिकांत भुसावरे, वसंत भोये, शामराव पवार, डॉ. प्रतिभा चौरे, लता गांगुर्डे, हर्षाली गायकवाड व वाघाळे येथील व परिसरातील युवा, महिला व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.