नंदुरबार येथील नाभिक युवकांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी.




अक्कलकुवा Akkalkuwa/SKpublicvoice 
प्रतिनिधी/अल्ताफ मलकानी



      नंदुरबार शहारातील कोकणीहिल येथे सुर्यवंशी हेअर आर्ट या दुकानात अनोळखी चार ते पाच अज्ञातांनी येऊन दुकानदार  दिपक भटु सुर्यवंशी व  कारागीर यांना मारहार केल्यामुळे नाभिक समाजातील चारही युवक जखमी झालेत. या घटनेची अक्कलकुवा नाभिक हितवर्धक संस्थेतर्फे निषेध करण्यात येत असून युवकांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करुन शासन करण्यात येण्यासंदर्भात अक्कलकुवा तहसीलदार रामजी राठोड यांना अक्कलकुवा नाभिक समाजाचा वतीने निवेदन सादर करण्यात आले.

       यावेळी विभागीय अध्यक्ष कथ्थुराम सैंदाणे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष किशोर हिरे, जिल्हाउपाध्यक्ष सुनील सोनवणे,अक्कलकुवा शहराध्यक्ष  मधुकर पवार,दुकानदार शहराध्यक्ष हिरा पवार,शांतीलाल हिरे,किशोर खोंडे,दीपक महाले, विजय सैंदाणे,राजा मंडीलक,शशिकांत सोनवणे,राजेंद्र पवार,बापू राठोड, गणेश मंडलिक,निंबा सोनवणे,अनिल अहिरे,सुनील पवार,जगदीश पवार,विजय हिरे,जतिन शिंदे,सचिन बोरसे, प्रकाश खीची आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post