अक्कलकुवा Akkalkuwa/SKpublicvoice
प्रतिनिधी/अल्ताफ मलकानी
"एक दिवस आमचाही बहरण्याचा" या थिम अंतर्गत लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट अक्कलकुवा युनिट वतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.आदिवासी भागातील गरीब आदिवासी पालक आपल्या पाल्यांना शिक्षण माध्यमातून त्यांच्या जीवनात दीप प्रज्वलनाचे काम करणाऱ्या पालकांना त्यांचे महत्त्व या मेळाव्यात पटवून देण्याचा उद्देश संस्थेचा असतो. त्यानिमित्ताने संस्था दरवर्षी पालक मेळावा आयोजित करत असते.
पालक होणे हा एक प्रकारचा बहुमानच आपल्याला मुलं झाल्यामुळे मिळालेला असतो, म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्या पाल्याचे आभार मानायला हवेत.एक वेळ आईबाबा होणं सोपं पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक असते. उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पद्धती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्याचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्व आहे.असे प्रतिपादन संस्थेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी भूषण यांनी केले.
लाईट ऑफ लाईफ ही सामाजिक संस्था अनाथ,एकपालक, गरीब दुर्लक्षित,आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाकरिता काम करते. या संस्थेच्या वतीने दरवर्षी पालक मेळावा,सक्षम पालकत्व प्रशिक्षण विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.मात्र या वर्षी संस्थेच्या ५६० लाभार्थी विद्यार्थ्याच्या पालकांकरीता हा पालक मेळावा आयोजित करण्यात आला, कार्यक्रमात मनोरंजक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.शिक्षणाचे महत्त्व यावर पालकांची वक्तृत्व स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रसंगी संस्थेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी भूषण बुनकर,संजय वळवी,सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद वसावे,अरविंद वसावे,शिवाजी पाडवी,श्यामसिंग वसावे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश वसावे व आभार प्रदर्शन रविंद्र वळवी यांनी केले.