नंदुरबार ! Nandurbar/SKpublicvoice
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे वतीने आज दि. 25/12/ 2022 रोजी नंदुरबार कार्यालयावर सत्यशोधक महिला सभेच्या वतीने स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष लीलाबाई वळवी, जमनाबई ठाकरे, छबीबाई गावित ,करणसिंग कोकणी ,मनोहर वळवी या प्रमुख नेत्यांनी स्त्रीमुक्ती दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच विक्रम गावित यांनी प्रस्तावित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वळवी यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील हजारो स्त्रिया- पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात महामानवाचे फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ,शाहू महाराज, यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलेल्या मनू स्मृतीचे आजच्या दिवशी दहन केले म्हणून
आजच्या दिवसाचे अवचित्य साधून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला व सत्याचा अखंड गायन करून महामानवाच्या स्त्रियांना समान मान सन्मान मिळायला पाहिजे , जसे शिक्षण, नोकरी, आरोग्य व्यवसाय व अन्य बाबी मध्ये महिलांना पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन नंदुरबार तालुका अध्यक्ष लिलाबाई वळवी यांनी केले.
वरील वक्ते यांनी मार्गदर्शन केले व समारंभ भाषण करणसिंग कोकणी यांनी केले.