
प्रकाशा! Prakasha/SKpublicvoice
प्रतिनिधी /मोईन खाटीक
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील नागबर्डा येथे हर घर जल योजने अंतर्गत कामाचा शुभारंभ करताना जेसीबीने खोदकाम सुरू असताना पुरातन प्राचीन मूर्ती सापडली. मूर्ती ही पूर्ण मातीमध्ये दाबली गेलेली होती. मातीत माखल्यामुळे ती सुरुवातीला पांढरी दिसत होती. बाहेर काढल्यानंतर पाण्याने धुतल्यानंतर ती काळ्या पाषाणाची दिसून आली. मूर्ती गावात सापडल्याची पहिली घटना नसून आतापर्यंत अनेक मूर्ती प्रकाशा गावात सापडल्या आहेत.
काळ्या पाषाणात अखंडित कोरलेली मूर्ती
नागबर्डा येथे सापडलेली मूर्ती काळा पाषाणाची असून पाच फूट उंचीची आहे. मूर्तीही बैठकीत असून, ध्यानस्थ अवस्थेत दिसून येत आहे. मूर्तीला चार भुजा दाखवण्यात आलेल्या आहेत. डोक्यावर घुमट, डोळे हे ध्यान अवस्थेत आहेत.
कानामध्ये कुंडल आहेत. गळ्यामध्ये हार दाखवलेला आहे. तर चारही भुजा मध्ये शस्त्र दाखवले आहेत. मूर्ती कुठेही खंडित झालेली दिसून येत नाही. पूर्ण अवस्थेत आहे, अशी माहिती दशरथ पुरुषोत्तम चौधरी यांना दिली. त्याच ठिकाणी आता ही मूर्तीची स्थापना करावी अशी मागणी आहे.