
नंदुरबार ! Nandurbar/ SKpublicvoice
प्रतिनिधी/ नरेश वळवी
शनिवारी ८ हजाराच्या वर क्विंटलचे कापसाचे भाव सोमवारी ७ हजार ५०० वर खाली घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पळाशी येथील बाजार समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे नंदुरबार आणि तळोदा रस्त्यावर तब्बल दोन किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिस विभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पोहचले. त्यानंतर तासभरात वाहनांची रहदारी सुरळीत केली. कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी अधिकारी, पोलिस अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत चर्चा केली. तर सीसीआने मंगळवारपासून कापसाचे दर फलकावर लावावेत, असा निर्णय घेण्यात आला.
यंदा कापसाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असतानाच पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी २०० कापसाच्या गाडया आल्या. शनिवारी प्रति क्विंटल कापसाला ८ हजार रूपयांपेक्षा अधिक दर मिळत असताना सोमवारी हा दर ५०० ते १००० रुपयांनी खाली घसरले. यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ही तर शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप करीत ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी सीसीआयच्या विरोधात आंदोलन सुरू केले. १९ डिसेंबर रोजी कापसाला ८ हजार २५० रूपये क्विंटल भाव मिळाला.
त्या दिवशी १३० वाहने कापूस विक्रीसाठी पळाशीला दाखल झाली होती. सोमवारी कापसाचे दर कोसळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्यासह ६० पोलिस अधिकारी घटनास्थळी हजर झाले. बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, ग्रेडर गणेश सोनुने तसे शेतकरी पंडित माळी यांच्यासह व्यापाऱ्यांत दीडवाजता समझोता झाला.
असतानाच पळाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी २०० कापसाच्या गाडया आल्या. शनिवारी प्रति क्विंटल कापसाला ८ हजार रूपयांपेक्षा अधिक दर मिळत असताना सोमवारी हा दर ५०० ते १००० रुपयांनी खाली घसरले. यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ही तर शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप करीत ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी सीसीआयच्या विरोधात आंदोलन सुरू केले.
१९ डिसेंबर रोजी कापसाला ८ हजार २५० रूपये क्विंटल भाव मिळाला. त्या दिवशी १३० वाहने कापूस विक्रीसाठी पळाशीला दाखल झाली होती. सोमवारी कापसाचे दर कोसळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्यासह ६० पोलिस अधिकारी घटनास्थळी हजर झाले. बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, ग्रेडर गणेश सोनुने तसे शेतकरी पंडित माळी यांच्यासह व्यापाऱ्यांत दीडवाजता समझोता झाला.
आजपासून फलकावर लिहिणार कापसाचे दर
सीसीआय कमीत कमी ७५०० रुपये दर कापसाला देईल. व त्यापेक्षा जास्त दरासाठी व्यापाऱ्यांनी लिलावात बोली लावून दर वाढवावे, असा समझोता झाला. मंगळवारपासून सीसीआयच्या फलकवर कापसाचे दर लिहणार आहे. कापसाचे दर खाली घसरतील किंवा वाढतील हे कुणीच सांगू शकत नाही, कापसाचे दर अनिश्चित आहेत. कमी जास्त होत आहेत, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.