शहादा ! Shahada/SKpublicvoice
प्रतिनिधी/शाहिद शहा
कथा हि रोगीसाठी दवा आहे. कथेची दवाही शारीरिक मानसिक आजारावर काम करते घरी केलेली कथा घरी केलेले पाठ घरी केलेले पूजन हे कच्चे मडकं आहे. तर भागवत यज्ञ मंडपात केलेली कथा ही एक पक्क मडक आहे. म्हणून कथा ही केली पाहिजे. भागवत सप्ताहाचे आयोजन हे केलं पाहिजे भागवत कथेतून भगवंताचे दर्शन होते. असे प्रतिपादन ह भ प खगेंद्र जी महाराज यांनी केले.
आई म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डोंगरगाव रस्त्यावरील माळसा नगरात दिनांक 24 डिसेंबर पासून भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याप्रसंगी ह भ प खगेंद्र जी महाराज हे बोलत होते. पुढे बोलताना महाराज म्हणाले. आजच्या मुलांना संस्कार व संस्कृतीची गरज आहे.. कथेच्या विषय प्रेम हा आहे प्रेम हे सत्य आहे , प्रेम हे गुढ आहे, प्रेम हे अगत्य आहे.रामाने भरतावर केलेले प्रेम हे अगत्य अगम्य आहे तर भरतने रामावर केलेले प्रेम हे गुढ आहे. आजच्या पिढीला भावाभावांमधील परभणी मधील प्रेमाची जाणीव होणे हे गरजेचे आहे. तर रामाने सीतेवर केलेल्या प्रेम हे तत्व प्रेम आहे.
पैसे आले तर चांगले दिवस येतात हे बरोबर आहे पण संस्काराच्या बाबतीत पहिले सारखे दिवस आले पाहिजे. आई वडील सासू-सासरे यांच्या माणसांना व्हायलाच पाहिजे याची उदाहरणे देताना संपूर्ण सभा मंडप भाऊक झाले होते. प्रेमाने सर्व जग जिंकता येते. संस्काराने नाती टिकवता येतात. अधून मधून भक्तिमय गीत गायनाने संपूर्ण सभा मंडप हा मंत्रमुग्ध झाला होता. तर संगीताच्या तालावर स्त्रिया ठेका घेत होत्या.
28 डिसेंबरला संकल्प ग्रुप व आई म्हाळसादेवी चॅरिटेबल सेवा समितीतर्फे भव्य रक्तदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे याच्या लाभ सर्व बंधू-भगिनींनी घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता 31 डिसेंबर रोजी भंडारा प्रसादाने होणार असून याच्या लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान माळसादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे व सेवा समितीने केले आहे.