शहादा ! Shahada / SKpublicvoice
आई म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शाकंभरी नवरात्र सुरू असल्यामुळे आई माळसादेवी मंदिरात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
भागवत कथेच्या विषय प्रेम आहे. पुढे बोलताना महाराज म्हणाले कथाही सुख देणारी म्हणजे सुखात कथा ही सर्वीकडे म्हणजे सर्वत्र आहे. कथा ही सुंदर, सुसंग घडविणारी असून सदैव प्रेम देणारी आहे. त्यामुळे भागवत कथेचे आयोजन केले पाहिजे. कथेमुळे आचरण, आत्मशुद्धी, अन्न शुद्धी होण्यास मदत होते.
प्रेमाची परिभाषा कळण्यासाठी डोळे हे काम करतात. प्रेम हे शरीराचा खालील अंगाने पाहिले तर वासना निर्माण होते. तसेच उर्ध्वगतीने पाहिले तर विचार तयार होतो व त्याने परमार्थ साधला जातो. पराक्रम करणे सोपे तर प्रेम करणे कठीण आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत हा एका करंगळी वर उचलला होता तर बासरीची धून वाजवताना दोघं हाताची बोट वापरावी लागली होती. भागवत कथा सांगताना अधून मधून भजन सुरू होते त्या भजनाच्या तालावर महिला व पुरुष वर्ग ताल घेऊन नाचत होते. त्यांच्या मधुर वाणीने सर्व मंडप हा मंत्रमुग्ध झाला होता.
भागवत सप्ताह ची सुरुवात दिनांक 24 डिसेंबर पासून झाली असून सुरुवातीला भागवत ग्रंथाची सवाद्य मिरवणूक स्वामी समर्थ केंद्र वृंदावन नगर या ठिकाणाहून काढण्यात आली. मिरवणुकीत महिलावर्गांनी व पुरुषांनी नाचण्याच्या आनंद घेतला. मिरवणूक ज्या मार्गावरून गेली त्या मार्गावर महिला वर्गांनी आपापल्या अंगणात रांगोळी काढून सजावट केलेली होती. म्हाळसा नगरात संपूर्ण भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
कृष्ण जन्म व रक्तदान शिबिराचे आयोजन हे 28 डिसेंबर ला करण्यात येणार असून. सांगता व भंडारा प्रसादाचे आयोजन हे 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेले आहे. भागवत रोज दुपारी दोन ते पाच या वेळात होणार असून भागवत ऐकण्यासाठी सर्व सहकारी बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे सह सर्व सभासद वर्गांनी केलेले आहे.
🟠🟤🟢🔵🟡🔴🟣⚫⚪🟠🟤🟢🔵🟡
Tags
भ प खगेंद्र महाराज