सानेगुरुजी जयंतीनिमित्त नवागावं शाळेत निबंध स्पर्धा आयोजित.



शहादा ! Shahada/ SKpublicvoice
प्रतिनिधी /शाहिद शहा


       शहादा -तालुक्यातील नावागावं जिल्हा परिषद शाळेत साने गुरुजी मित्र मंडळा तर्फे सानेगुरुजी जयंती निमित्त निबंध स्पर्धा आयोजीत  करण्यात आली होती.
         या कार्यकामात सर्वप्रथम सानेगुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
         
     या नंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या कवितेने कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आला.
      या कार्यक्रमाचे अध्यक्ष तळोदा येथील डॉ सुभाष पाटील होते तर प्रमुख पाहुणे मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, सचिव गुलाबराव पवार, व्यवस्थापण समेती अध्यक्ष गमा पाडवी उपाध्यक्ष तुकाराम वळवी, सदस्य बाबुलाल ठाकरे,संतोष पाटील,मुख्यध्यापक काशिनाथ सोनवणे, विनायक सावळे आदी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेत अ गटात सर्व प्रथम सरस्वती काळुसिंग पाडवी, द्वितीय गौतम गियान खर्डे तृतीय रोशन फुफाजी ठाकरे 
ब गटात सर्व प्रथम दिक्षा संजय खर्डे, द्वितीय आदित्य दिवाण  पावरा,तृतीय अक्षरा सोनसिंग पावरा 

       क गटात सर्व प्रथम दिपीका भरत बर्डे  द्वितीय वनराज इंदास पावरा तृतीय पिंकी किसन पटले 
ड गटात  सर्व प्रथम दिपीका भरत खर्डे द्वितीय दिपक ईश्वर खर्डे तृतीय निर्मला किसन खर्डे 
हे विजेते झाले..
विजेत्यांना मान्यवरांचा हस्ते सन्मानपत्र व बक्षिसे देऊन सत्कार करणात आले.

       या कार्यक्रमात डॉ सुभाष पाटील ,माणक चौधरी, काशिनाथ सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विध्यार्थ्यांनी व्यसन न करण्याची प्रतिन्या घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गुलाबराव पवार यांनी तर सूत्रसंचालन सत्तरसिंग पावरा यांनी आभार परशुराम पावरा 
यांनी मानले.

      कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी, रविंद्र पावरा, दिलवरसिंग पाडवी, धरमसिंग पाडवी, सावन ठाकरे परिश्रम घेतले.


🌀🟣🌀🔴🌀🟡🌀🔵🌀🟢🌀🟤🌀🟠

Post a Comment

Previous Post Next Post