
तळोदा ! Taloda/ SKpublicvoice
प्रतिनिधि/ भास्कर पाडवी
तळोदा पालिका सभागृहात नगरपालिकेची आज शुक्रवारी सर्वसाधारण सभा होत असून पालिका सत्ताधाऱ्यांची ही शेवटची सभा आहे. दरम्यान या सभेत तळोदा शहराचा प्रारूप विकास आराखडा गाजणार असे चित्र दिसत आहे. नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेत होणारी ही सभा सत्ताधारी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचीही शेवटची सभा असणार आहे.
सभेचा अजेंडा वाटप केला असून शहर प्रारूप विकास आराखड्यास मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर सत्ताधारी व विरोधी गट काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. तब्बल ३५ वर्षानंतर नगरपालिकेने शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला.
शहराच्या चारही बाजूंना पालिकेने आपली हद्द वाढवली आहे त्यामुळे नवीन वसाहती या पालिका आधी देणार आहेत यात पालिकेचे उत्पन्नात देखील वाढ होणार आहे पालिका घरपट्टी पाणीपट्टी गेल्या दोन वर्षापासून आकार असल्याने त्यांना पायाभूत सुविधा देणे पालिकेचे जबाबदारी आहे शिवाय प्रारूप विकास आराखड्यात पालिकेने बहुसंख्य क्षेत्र पायाभूत सुविधांसाठी नमूद केले आहे.
त्यामुळे पालिकेच्या या विकास आराखड्यात मंजूर द्यावी की शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून विरोध करावा, अशा स्थितीत सत्ताधारी व विरोधी गट आहे पालिकेची निवडणूक यंदा होऊ घातली आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत शहर प्रारूप विकास आराखडा हा मुद्दा कळीचा असणार आहे. दरम्यान याबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने सभागृहात बांधू बांधून विरोध करावा अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील काही नगरसेवकांना करण्यात येत आहे.
पालिका सभागृहात मागील पाच वर्षापासून कोणताही विरोध न करणारे नगरसेवक यावेळी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. आराखड्यावर ३१७ शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या याबाबत नगर विकास विभाग येथून तज्ञ समिती सदस्य आले होते त्यांनी शेतकऱ्यांच्या हरकती सुनावणी घेऊन त्याचा अहवाल न.पा. प्रशासनाकडे अहवाल सादर केला असून शेतकऱ्यांचे लक्ष पालिकेच्या सभेकडे लागले आहे.
प्रशासकपदी काेण, याबाबत उत्सुकता
दरम्यान तळोदा पालिकेत प्रशासक कोण बसेल, याची राजकीय वर्तुळात चर्चा असून मंदार पत्की यांच्याकडे तळोदा आदिवासी विकास प्रकल्पासोबतच तळोदा उप विभागीय अधिकारी या दोन महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी आहे. तर गिरीश वखारे यांच्याकडे तहसीलदार पदाची जबाबदारी असल्याने पालिकेच्या प्रशासक पद कोणाकडे दिले जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
🟢⚪🟤⚫🟡🟣🔴🟠🔵🟢⚪🟤⚫🟡
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹