साक्री ! Sakri / SKpublicvoice
प्रतिनिधी / अकील शहा
साक्री शहरात पुरुष व महिला होमगार्ड यांनी 76 वा होमगार्ड वर्धापन सप्ताह असल्याने साक्री शहरात माननीय जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सो, जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे केंद्र नायक श्री दिपक चौधरी सर,ए सो श्री दसनूरकर सो,सामुग्री प्रभन्धक श्री मंगल पाटील, वरिष्ठ लिपिक श्री परदेशी यांचे मार्गदर्शनाने साक्री शहरात रूटमार्च (रॅली ) काढण्यात आली. तसेच साक्री पोलीस स्टेशन आवारातील (परिसर )ग्रामीण रुग्णालय साक्री आवारातील, साक्री दिवाणी व फौजदारी न्यायालय (कोर्ट )परिसरा मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले वेळी
साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख सो,व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ विवेक जाधव यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.व साक्री न्यायालयाचे मॅजिस्टेंट यांचे सहकार्य व मार्गदर्शनाने हा 76 वा होमगार्ड वर्धापन सप्ताह दिन आनंदाने साजरा करण्यात आला.यावेळी तालुका होमगार्ड समादेशक श्री मनोज पगार व पथकातील होमगार्ड प्रशांत दाणे, अमीन पिंजारी, दिपक मोरे, राहुल बोरसे, रवींद्र साळवे, मधुकर गोसावी, राजेंद्र बोराळे किशोर वाघ, महिला होमगार्ड, खैरनार, ईशी, चव्हाण, कोठावदे, व इतर पथकातील होमगार्ड यांचे सहकार्यणे होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला.व सर्व अधिकारी वर्ग यांचे विशेष आभार मानण्यात आले.
🟤⚪🟣⚫🟢🟠🔵🟡🔴🟣🟠🟤🟠🔵
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
Tags
होमगार्ड वर्धापन