शेवाळी(दा) येथे २१ डिसेंबरला फिरत्या नारळाचा कार्यक्रम; राज्यभरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे ह.भ.प. मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आवाहन




      साक्री ! Sakri / SKpublicvoice
      प्रतिनिधी /अकील शहा

     साक्री : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा) येथे स्वानंद सुखनिवासी वै. गुरुवर्य जोग महाराज तसेच वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या कृपा प्रसादाने व महन्महनीय प.प. गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या असीम तपस्वीतेतून व कृपाप्रसादाने निर्मित आशीर्वादाने व श्रद्धास्थान ह. भ.प.सौ. यशोदाजी आक्का यांच्या मार्गदर्शनाने श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पद निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्ष ५०वे निमित्ताने शेवाळी(दा) येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम येत्या २१ डिसेंबरला बुधवारी रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पुढील प्रमाणे संतवृद उपस्थित राहणार आहेत-
      
      ह.भ.प.वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा,गोराणेकर,ह.भ.प. शांतीसागर जयराम बाबा, गोंडेगांवकर, ह.भ.आचार्य हरिभाऊ महाराज तळवाडे भवाडे, ह.भ.प. विश्वनाथ नाना महाराज, तळवाडे दुंधे, ह.भ.प.भाऊसाहेब महाराज शास्त्री, वाराणसी,ह.भ.प. अशोकभाऊ महाराज, भीमाशंकर, मठाधिपती महंत श्री १००८ प्रवणगिरीजी बाबाजी श्री क्षेत्र नागाई योगी दिनानाथ गुरुगहिनीनाथजी गोरक्षनाथ मंदिर कळंभीर आदि.


    कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे

दुपारी ११ते ३ माऊलींचा रथ व पादुकांची मिरवणूक काढण्यात येईल, दुपारी २ ते ८ दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,दुपारी ३:३० ते ४:३० ह.भ.प. विश्वनाथ नाना महाराज तळवाडेकर यांचे प्रवचन ठेवण्यात आले आहे,संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व गीतापाठ होईल, रात्री ८ ते ८:३० श्री. निवृत्तीनाथ महाराज यांचे पदयात्रेचे नियोजन करण्यात येईल,रात्री ९ ते ११ वाजता श्री.ह.भ.प. एकनाथ महाराज चतर शास्त्री आळंदी यांचे जाहीर कीर्तन होईल, तरी या कार्यक्रमाचा राज्यभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन शेवाळी(दा) येथील समस्त ह.भ.प.भजनी मंडळ, ग्रामपंचायत , ग्रामसुधार मंडळ,वि.वि.का.से. सोसायटी, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


🔹🔷🟣🌀🔹🔷🟢🌀🔹🔷🔴🌀🔹

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post