नंदुरबारचा पारा 11.4 सेल्सिअस, कडाक्याच्या थंडीने भरली हुडहुडी.




नंदूरबार ! Nandurbar/SKpublicvoice 



          शहराच्या तापमानात दोन दिवसांपासून घट झाली असून, यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कडाक्याची थंडी पडलेली जाणवायला लागली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात १३ अंश सेल्सिअस तापमान मोजण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी हेच तापमान १२ अंशांवर खाली आले तर शनिवारी तापमानाचा पारा उतरून ११.४ सेेल्सिअसवर आला. दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात १२ ते १५ डिसेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

         १४ डिसेंबरपर्यंत हवामान अंशत: ढगाळ
जिल्ह्यात १० ते १४ डिसेंबरपर्यंत हवामान अंशत: ढगाळ राहील. तसेच ११ डिसेंबरपर्यंत हवामान काेरडे राहणार आहे. कमाल तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस राहणार आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ सचिन फड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

         तोरणमाळच्या तापमानातही झाली घट
हवामानात घट आल्याने पहाटे तसेच रात्रीच्या वेळेस शेकोट्या पेटवण्यात येत असून, सकाळी माॅर्निंग ग्रुपच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच तोरणमाळ या थंड हवेच्या पर्यटनस्थळी ९ अंश सेल्सिअस तापमान असून, या भागात पर्यटकांची संख्या वाढू शकते. तसेच येत्या दोन-तीन दिवसांनंतर पाऊस जर पडला तर नंदुरबारच्या मिरची पथारीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



🔵🔴🟢⚫🟤🟣🟠⚪🟡🟢🔴🟣🔵🟠

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post