जिल्हा बाल न्याय समितीच्या अशासकीय सदस्यासाठी अर्ज सादर करावेत-रा.वा. बिरारी



  नंदुरबार l Nandurbar/SKpublicvoice

       दि.25 : मुलांची काळजी व सरंक्षण अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे, या समितीत बालकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व मानसोपचार तज्ञ अशा दोन अशासकीय अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तिंनी 3 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहातील एक सदस्य व बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ञ अशा दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. 

सदस्यत्वासाठी पात्रता
समितीच्या अशासकीय सदस्यासाठी इच्छुक किमान पदवीधर असणे आवश्यक असुन बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे असणे आवश्यक असेल. वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. या अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणूकीपासून तीन वर्षांपर्यंत राहील.

समिती सदस्यासाठी इच्छुक व्यक्तिंनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज, वैयक्तिक माहिती, फोटोसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्रमांक 226, टोकरतलाव रोड, नंदुरबार 425412 येथे 3 डिसेंबर, 2022 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी 02564-210047 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. बिरारी यांनी केले आहे.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹.           🌹 प्रतिनिधी नेमणे सुरू आहे🌹



जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा .
मुख्य संचालक :-श्री . सईद कुरेशी 
📱95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post