रात्री आठ वाजता पलटी झालेल्या ट्राला ला क्रुझर ची जोरदार धडक,....महामार्गावर भिषण अपघात...
विसरवाडी l Visarvadi/SKpublicvoice
प्रतिनिधी... समीर पठाण
सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरिल विसरवाडी पासुन तीन कि.मी अंतरावर असलेले बडीँपाडा गावाच्या फाट्याजवळ संध्याकाळी लोखंडी पाईप घेवुन जाणारा ट्राला पलटी झाला होता , रात्री आठ वाजता धुळे हुन सुरत कडे भरघाव वेगात प्रवासी घेवुन जाणारी क्रुझर जिप क्रमांक जी.जे 5 जे.बी.6578 ने ,बडीँपाडा फाट्यावर पलटी झालेल्या ट्रालाला माघुन जोरदार धडक दिल्याने त्या बसलेले चालकासह पाच प्रवासी जबर जखमी झाले, धडकेचा मोठा आवाज आल्याने बडीँपाडा येथील गावकरी धावत आले त्यांनी ताबडतोब 108 रुग्ण वाहिके ला फोन करून पाचरण केले आणी जखमी ना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अपघात ईतका भिषण होता की क्रुझर जिप चा पुढील भाग चक्काचूर झाला आहे,अपघातात विकी राजु राजपूत रा.अमळनेर, गौरव शरद भदाणे रा.सुरत,यश रतिलाल पाटील. रा.सुरत,जयेश नरेश बोरसे रा.सुरत,दशंँन राजेंद्र नरसाडे रा.सुरत हे प्रवासी जबर जखमी झाले आहेत ,घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.भोजराज धनगर, प्रकाश अहिरे,लिनेश पाडवी, राजु कोकणी यांनी धाव घेवुन जखमी उपचारासाठी रवाना केले ,रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल ची प्रक्रिया सुरू होती.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
Tags
भीषण अपघात




