
शहरातील आदेश्वरनगरात जलकुंभ बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. जलकुंभ ६ लाख लिटर क्षमतेचे असून, १ कोटी १९ लाख रुपये बांधकामास खर्च येणार आहे. नवीन जलकुंभामुळे रेल्वे पट्ट्याकडील नागरिकांना मोठा लाभ होईल.नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी व नागरिकांच्या पाण्याची समस्या सुटावी यासाठी रेल्वे पट्ट्यापलीकडील आदेश्वरनगरात ६ लाख लिटर्स क्षमतेच्या उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन शनिवारी सकाळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने केला ठराव
परिसरामध्ये ३० वर्षांपूर्वीचे जुने जलकुंभ आहे. त्यास जमीनदोस्त करून नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा व पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी नगरपालिकेने आदेश्वर नगरात नवीन जलकुंभ बांधण्याच्या ठराव केला आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹