रेल्वे प्रवासी सुरक्षा बैठक कल्याणमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न...

 


कल्याण प्रतिनिधी/ विशाल कुरकुटे 

कल्याण येथील कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे शुक्रवार (दि. २८ फेब्रुवारी २०२६) रोजी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.ही बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष, फळ-फुल-भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेचे अध्यक्ष तसेच सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती (ZRUCC) सदस्य आणि रेल्वे मंत्रालयचे सदस्य अभिजीत धुरत प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत तसेच सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“रेल्वे पोलीस हे सदैव प्रवाशांच्या सेवेत असतात. दरवर्षीप्रमाणे सणासुदीच्या काळात कल्याणसह इतर स्थानकांवरही चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जवान रात्रंदिवस सेवेत कार्यरत असतात,” असे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी व्यक्त केले.

या बैठकीस महासंघाचे ज्येष्ठ सदस्य रमेश शिरकर, अरुण पराडकर, आशाताई पडवळ, अरुणाताई गोफणे, रुपाली पराडकर, स्मिता बावडेकर, तुलसा गुप्ता, वंदना वाणी, सुनील करपे, सचिन नागवेकर, बाळकृष्ण तळेकर, लक्ष्मण कडलक यांच्यासह पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post