वलांडी/प्रतिनिधी:भ्रष्टाचाराविरोधात झुंज देणारे, सत्यासाठी झगडणारे, आणि जनतेच्या न्यायहक्कासाठी निर्भीडपणे आवाज उठवणारे जन सामान्याचा कायदा या वृत्तपत्राचे संपादक व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांना साहित्य सारथी पत्रकार रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१२ ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर येथील जय क्रांती महाविद्यालयात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य सारथी कला मंच महाराष्ट्र राज्य यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सौदागर मोहम्मद रफी यांनी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून ५० भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई घडवून आणली. ४० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत २१० गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्यास भाग पाडले. त्याचबरोबर ५০০ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून प्रशासनाला जबाबदारीने काम करण्यास भाग पाडले.
हा पुरस्कार त्याच्या निर्भीड पत्रकारितेचा आणि समाजहितासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा गौरव केला.
साहित्य सारथी कला मंचचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, अध्यक्ष गंगाधर डिगोळे, उपाध्यक्ष शादुल बौडीवाले, कार्याध्यक्ष गणेश परळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
"सत्यासाठी ज्वालामुखी ठरलेली लेखणी पत्रकार सौदागर मोहम्मद रफींना ‘पत्रकाररत्न’ पुरस्कार"
"भ्रष्ट यंत्रणेला हादरवणाऱ्या पत्रकाराच्या लढ्याला मिळाला ‘पत्रकाररत्न’चा मुकुट!"
"सत्तेच्या गलियार्यात थरकाप उडवणाऱ्या पत्रकाराचं ‘साहित्य सारथी’कडून मोठं कौतुक!"
"लेखणी बनली तलवार सौदागर मोहम्मद रफी यांचा सन्मान ठरला प्रेरणादायी!"
