दोंडाईचा/ प्रतिनिधी :आज दि. 27/10/2025 मुस्लिम सेवा संघ दोंडाईचा तर्फे मा .उपविभागीय अधिकारी सा.बा. उपविभाग दोंडाईचा यांना एल सी गेट नंबर 105 रेल्वे गेट वर बांधण्यात आलेला उड्डाणपुलावर गरीब नवाज कॉलनी परिसरातील भागात 2 महिने पासून बंद असलेले स्ट्रीट लाइट सुरू करण्यात यावे,तसेच उड्डाणपुलावरून तेज गती ने वाहने उतरतात म्हणून रोडावर गतिरोधक बसविण्यात यावे असे निवेदन देण्यात आले या वेळी मुस्लिम सेवा संघ दोंडाईचा चे धुळे जिल्हा अध्यक्ष मंजूम पठाण, मोहसीन पठाण,इम्रान पठाण, युसुफ मिर्झा , अजीम मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

