नंदुरबार प्रतिनिधी: सविस्तर वृत्त असे की , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावरशा कादरशा यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की, नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत भोणे चाकळे, नळवा गुजर भवानी वेडावत शिवपुर इत्यादी रस्त्यांची चौकशी करून भ्रष्टाचार करणारे संबंधित अभियंतांवर कारवाई करण्यात यावी.तसेच नंदुरबार जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत निकृष्ट बांधलेल्या साठवण बंधाऱ्यांची तालुका निहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. व संबंधित अधिकाऱ्यांच्या बचाव करणारा कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी यांची देखील चौकशी करण्यात यावी. तसेच नंदुरबार शहरातील गोरगरीब कुटुंबांना शासन योजना नुसार मोफत घरकुल बांधून द्यावे. व 240 घरकुलांच्या लवकरात लवकर वाटप करण्यात यावा असे विविध मागण्यासाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत करण्यात आले आहे. यावेळी दत्तू पवारसह मोठ्या संख्येने घरकुलांचे लाभार्थी उपस्थित होते.
