नंदुरबार/प्रतिनिधी:दि. 27 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील असलोद ते मलगाव दरम्यान एक इसम स्वतःच्या आर्थिक फायदयसाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक सुका गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणार आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळाल्यावरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास सोबत शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांना याबाबत माहिती कळवून कारवाई करणेस सांगितले.
मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे पोलीस पथके हे असलोद ते मलगाव दरम्यान दुधखेडा गावाचे पुढे रस्त्यावर सापळा लावुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना मलगाव मानमोडया गावाकडून तीन मोटारसायकली येतांना दिसल्या. सदर मोटारसायकलींना हात देऊन थांबविण्यात आले. सदर मोटारसायकल वरील इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव गुजाऱ्या मंसाराम पावरा, वय- 20 वर्षे, रा.सटीपाणी जामजिरा ता. शिरपुर जि.धुळे, शिवदास विरसिंग पावरा, वय- 35 वर्षे रा.गदडदेव ता. शिरपुर जि.धुळे, गणेश विरसिंग पावरा, वय 21 वर्षे, रा. गदडदेव, ता. शिरपुर जि. धुळे, नंदिलाल रोहिदास पावरा, वय- 19 वर्षे, रा. आंबाफाटा ता. शिरपुर, जि. धुळे असे सांगितले. त्यांना त्यांचे मोटारसायकलवर असलेल्या दोन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्यांमध्ये काय आहे बाबत विचारणा करता ते घाबरुन जाऊन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावेळी त्यांचेवर संशय अधिक बळावल्याने त्यांचे वाहनावरील पांढऱ्या गोण्यांची तपासणी करता त्यामध्ये बेकायदेशीररित्या अंबुस उग्र वासाचा सुका गांजा पथकास मिळुन आल्याने सदर इसमांना लागलीच पोलीस पथकाने ताब्यात घेतले. सदर इसमांकडुन एकुण 53 किलो 330 ग्रॅम वजनाचा सुका गांजा (अंमली पदार्थ) व 3 वाहने असा एकुण 12 लक्ष 66 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याअन्वये वर नमुद अ.क्र. 1 ते 4 आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 381/ 2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम -1985 चे कलम 8 (क), 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, स्थागुशा पोउपनि मुकेश पवार, शहादा पोलीस ठाण्याचे पोउपनि छगन चव्हाण, स्थागुशा स्टाफ पोहेकॉ मुकेश तावडे, विशाल नागरे, बापू बागुल, पोना/विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोशि/अभय राजपुत, भरत उगले यांनी केली आहे.
