नंदुरबार/प्रतिनिधी :चालू वर्षीचा 2025 चा क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार काॅम्रेड किशोर ढमाले यांना देण्यात येणार.तसेच क्रांतिविरागना हौसाताई पाटील पुरस्कार ॲड. शैलजाताई मोळक यांना देण्यात येणार आहे. काॅम्रेड किशोर ढमाले हे धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील डोंगर दर्यात राहणाऱ्या आदिवासींच्या विकासासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत संघर्ष करत आहेत.
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे मार्फत डोंगर दर्यात पाड्यात, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अडाणी अशिक्षित लोकांना संघटीत करुन, त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करणे , प्रस्तापित सरकार विरोधात त्यांनां लढाईला तयार करणे , हे काम ते सतत गेली 40 वर्षांहून अधिक काळ करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कामामध्ये त्यानी स्वतःला झोकून दिले आहे. प्रागतिक विचारांच्या लोकांना, पक्षांना एकत्र करणेसाठी धडपडत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्म शताब्दी समिती हणमंतवडिये आणि कडेगांव/ खानापूर साहीत्य मंडळ यांनी क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार 2025 हा त्यांना देणेचा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराचे हे 20 वेळ वर्षं आहे. या अगोदर हा पुरस्कार प्राचार्य सायनाकर , ॲड दत्ताजीराव माने , क्रांतिवीर रामचंद्र लाड , प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, या वैभव नायकवडी, या. उल्का महाजन, काॅम्रेड दत्ता देसाई, डॉ.शैलजा दाभोलकर, प्रा. डॉ अजिज नदाफ , प्रा. प्रतिमा परदेशी, भाई विवेक पाटील, प्रा. डॉ श्रीमंत कोकाटे, भाई धनंजय पाटील, काॅम्रेड धनाजी गुरव इत्यादींना हा पुरस्कार दिला आहे.
क्रातिविरागना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार चे हे तिसरे वर्षं आहे. ॲड शैलजाताई मोळक या पुरोगामी विचारवंत आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या लढाऊ कार्यकर्त्यां आहेत. स्वतः चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत , उत्तम लेखिका आहेत. सजग प्रकाशिका आहेत. अ प्रकाशित कर्तुत्ववान महिलांना प्रकाशात आणनेच मोठं काम त्या सतत करत आहेत. वाचन चळवळ चालवणेसाठी सार्वजनिक वाचनालय चालवत आहेत. जिजाऊ, शिवराय, संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार त्या सातत्याने करीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना क्रांतिविरागना हौसाताई पाटील सामाजिक पुरस्कार 2025 देणेचा निर्णय घेतला आहे. या अगोदर हा पुरस्कार काॅम्रेड स्मिताताई पानसरे, प्रा. डॉ लीनाताई निकम यांना देण्यात आला आहे. हणमंतवडिये येथे श्री आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रा. विलासराव पाटील, प्रा विश्वनाथ गायकवाड, कवी रघुराज मेटकरी, एम बी जमादार, सु. धो. मोहीते, आत्माराम मोरे, ॲड सुभाष पाटील यांच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. हे दोन्ही पुरस्कार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी हणमंतवडिये येथे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
ॲड. सुभाष पाटील.
कार्यवाह
क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्म शताब्दी समिती हणमंतवडिये.










