केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाने सर्व ग्रामपंचायतीत पेसा दिवस साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत खापर येथे पेसा दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

 




प्रतिनिधी |अक्कलकुवा

पेसा कायद्याच्या निर्मितीला 28 वर्षे पूर्ण झाले आहेत त्या अनुषंगाने केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाने सर्व ग्रामपंचायतीत पेसा दिवस साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते त्यानुसार ग्रुप ग्रामपंचायत खापर येथे पेसा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडुन खापर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.      

       सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे माता याहामोगी, भगवान बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला वाहण्यात आली. तालुका कक्षाच्या तालुका व्यवस्थापक आशा पाडवी, पेसा समन्वयक जगन टी. वळवी यांनी उपस्थितांना पेसा नियम 2014 कायद्यान्वये गावाला मिळालेले अधिकार, आदिवासी बांधवांच्या रुढी, प्रथा, परंपरा यांचे जतन व संवर्धन याविषयी स्थानिक आदिवासी भाषेतुन पेसा चे महत्व पटवुन दिले व पेसा कायद्या बाबत जनजागृती केली. तसेच लघु पेसा पुस्तिका वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅली द्वारे जनजागृती केली. खापर गृप ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पाडवी, ग्रा.पं. सदस्य ललित जाट यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. ग्रामपंचायत कार्यालया पासुन रॅलीला प्रारंभ करण्यात आला व रॅली झेंडा चौक, जैन मंदिर, बस स्थानक ,मेनरोड, बाजारपेठ मार्गे ग्रामपंचायत कार्यालय आवारात समाप्ती करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी विनोद ढोडरे, ग्रा. पं. सदस्य शोएब तेली, देविदास वसावे, विनायक गावित, वंदना चौधरी, खापर पेसा समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र वसावे, आमलीफळी पेसा समितीचे अध्यक्ष अमर वसावे आदीं सह अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post