धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) येथे 13ऑगस्ट 2023 रविवारी रोजी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आदिवासी बाधवांच्या स्मशानभूमी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात वृद्धानी सहभाग घेतला. व त्यांनी वृक्षारोपणाचा भरपूर आनंद घेतला. या कार्यक्रमात माया केअर फाऊंडेशन च्या स्वयंसेविका सुलताना शहा मॅडम उपस्थित राहून मदत केली. हा कार्यक्रम संस्थेच्या संस्थापिका मंजिरी जोशी मॅडम व अभय जोशी सर, मदतनीस वंदना साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी माया केअर फाउंडेशनच्या स्वयम सेविका सुलताना शहा यांनी हे फाउंडेशन राज्यभर योजना राबवित असून खास करून वृद्ध लोकांसाठी मदत व सहकार्य करीत आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी शेवाळी गावातील उत्तम माळचे, अरुण माळचे, रामा बागुल, सुपडू माळचे, लखन पवार, प्रल्लाद पवार, इसा शहा आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

