"मेरी मिट्टी मेरा देश .....मिट्टी को नमन वीरो को वंदन".... अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम...

 




 शहादा/प्रतिनिधी 


भारत सरकार यांच्या आदेशान्वये देशभरात संपूर्ण वर्ष आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला त्याच धर्तीवर महोत्सवाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत देशभरात 'मेरी मिट्टी मेरा देश .....मिट्टी को नमन वीरो को वंदन'.... अभियान राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने शहरात नगरपालिका व संकल्प ग्रुप तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात शिवतीर्थ, दोंडाईचा रोड, मेन रोड येथील केरकचरा, गवत व रस्त्यावरील माती साफ करण्यात आली. 

यावेळी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी,अधिकारी, संकल्प ग्रुप चे निखिल सोनार, रोहित अहिरे,अंकित सोनार, भूषण पाटील, पिनाकिन पटेल, बिपिन चव्हाण, मुकेश पाटील ,संदीप बोरसे, प्रशांत कदम,संदीप बेलदार, डॉ. लक्ष्मण सोनार, सुरेश चव्हाण, गुलाब सुतार, राकेश कोचर, प्रमोद मोरे आदी नी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post