शहादा ! Shahada /SKpublicvoice
प्रतिनिधी/अल्बक्ष काझी
“नूर ए इलाही” फाऊंडेशन तर्फे माजी नगर शहादा येथे दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी, मुस्लीम समाजातील विवीध जमातीतील लोकांसाठी सामुदायिक विवाह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये 11 विवाह संपन्न झाले. या प्रकारचा मेळावा मुस्लीम समाजात शहादा शहरात प्रतमच पार पडला, ज्यात विवध जमातीचे लोकांनी एकाच मंडपात येऊन लग्न सोहळा यशस्वी केल्याचे निर्शनास आले. सदर सोहळयात वधू कडून ७ हजार रुपये व वरा कडून फक्तं ५ हजार रु मात्र घेण्यात आले. ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची होती तसेच अनाथ वधु यांच्याकडून एक हि रूपया घेतला गेला नाही, त्यांचा खर्च फाऊंडेशन ला या सोहळयात आर्थिक मदत करणाऱ्यांनी उचलला.
सदर सोहळ्यात भेट दिलेल्या मंडळीने नुर ए ईलाही फाउंडेशनचे भरभरून कौतुक केले, तसेच वधू व वरांचे अनेक नातेवाईक सोहळ्याचे आयोजन बघून भारावून गेले, आणि अशी इच्छा जाहीर केली की या प्रकारचा सोहळा दर वर्षी आयोजित करण्यात यावे जेणे करुन आजच्या या महागाईच्या काळात, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अश्या लोकांना एक दिलासा मिळेल.
या सोहळ्यात लग्न केलेल्या वधू-वराला "नूर ए इलाही” फाऊंडेशन तर्फे संसारपोयोगी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू भेट देण्यात आली. सदर सोहळ्यात शहराच्या विवध मान्यवरांनी हजेरी लावली व या सोहळ्यात आर्थिक मदत ही केली. ज्यात हाजी अल्ताफ मेमन, हाजी शकील अन्सारी, महमूदभाई बोरिंगवाले, मुस्तकिम भाई अन्सारी, हाजी जिशान पठाण, शेख अलीम शेख कय्यूम शेख कलीम, रहीमभाई मणियार, शेख मुसासहाब तेली, हन्नान हाजी गफ्फार खाटीक, हाजी यनुस बागवान, डॉ. रिजवान मंसुरी, ॲड. अल्ताफ हस्मानी, हा. कलीम मंसूरी, साजिद मन्सुरी, हाजी निहाल अन्सारी, हाजी हारून अन्सारी, हाजी जफर रहिमोद्दिन,हाजी सलीम मेमन , हाजी सलिम रशीद, नासिर पठाण आदी हजर होते.
सर्व उपस्थीत मान्यवरांनी नूर ए ईलाही फाऊंडेशनचे पदाधिकारी
अध्यक्ष - असलम शेख अलीम
उपाध्यक्ष - शाहनवाज शाह निसार
सचिव - जाकिर खान दिलावर खान
खजींदार - पठान शाहरुख खान अय्यूब खान
सहसचिव - नाजिम तकदीर पिंजारी
सहखजिंदार - वसीम सलीम पिंजारि
सल्लागार - सलामत अबुल असरार अंसारी
सल्लागार - अबरार शाह रहीम शाह
सदस्य - शोएब खान यूसुफ खान बेलदार
सदस्य - अशफाक इब्राहिम बागवान
सदस्य - पठान शाहरुख खान बशीर खान
सदस्य - मोहसिन शेख हुसनोद्दीन
सदस्य - समीर शेख कासम
सदस्य - रिजवान शेख नबू
यांचे आभार व्यक्त केले व त्यांना भविष्यात अश्या सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सदर सोहळा माजी नगरसेवक वसीम तेली आणि माजी नगरसेवक ॲड. दानिश पठान यांच्या निरीक्षणाखाली पार पडला. मौलाना आकिब रझा साहेब व मौलाना मोईन साहेब यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खलील शाह सर यांनी केले.