सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा नंदुरबार यांचे निवेदन ,शेतकरीविरोधी कायदे, शेतीसाठी लावलेले नियम त्वरित रद्द करा.




नंदुरबार ! Nandurbar/ SKpublicvoice 

         सत्यशोधक शेतकरी सभा नंदुरबार यांच्यामार्फत प्रमुख मागण्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन,शेती वाचवा, लोकतंत्र वाचवा, संविधान वाचवा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा आणि केंद्र सरकारच्या नियमांना रद्द करा, अशा विविध मागण्यांसंदर्भात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे राष्ट्रपतींकडे पाठवण्यासाठी येथील तहसीलदारांना निवेदन दिले.देश आम्हाला अन्नदाता म्हणतो ७५ वर्षांपासून आम्ही या कार्यात कुठलाही कसूर केलेला नाही.

देश स्वतंत्र झाला तेव्हा ३३ कोटी देशवासीयांचे पोट आम्ही भरत होतो. आताही शेतीच्या साहाय्याने १४० कोटी लोकांना अन्न पुरवताे. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती तेव्हा आम्ही जीवाची पर्वा न करता उत्पादन केले.

अन्न भंडार खाली होऊ दिले नाही. पण त्या बदल्यात सरकारने आमची शेती आमच्या हातातून काढून कंपनीच्या हातात देऊ केली. पराळी जाळल्यावर गुन्हा दाखल करणे आणि वीज बिल कायद्याची टांगती तलवार डोक्यावर टाकली आहे. यावेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे करणसिंग कोकणी, विक्रम गावित, लालसिंग वसावे, रविदास वळवी, लीलाबाई वळवी, बाबुराव ठाकरे, किसन वळवी, महादेव वळवी, जमुनाबाई ठाकरे, काशीनाथ कोकणी, यशवंत चौरे, विनायक वळवी आदी उपस्थित होते.

या आहेत विविध मागण्या
स्वामीनाथन आयोगानुसार समर्थन मूल्यानुसार पूर्ण पिकांवर खरेदीची संधी मिळावी, आदिवासी व इतर व वन निवासी हक्क कायदा पारित करावा, आदिवासी वन हक्क कायद्यानुसार सातबारा द्यावा, वन संवर्धन कायदा २०२२ रद्द करावा, अतिवृष्टी व अल्पभूधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, एमएसईबी कायदा लागू करावा, शेतकऱ्यांचे कर्ज तसेच शेतकऱ्यांचे वीज बिलही माफ करावे, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.



🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀


🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹



       जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.

          मुख्य संचालक:-  श्री. सईद कुरेशी

                 📱95 29 25 53 54

Post a Comment

Previous Post Next Post