अक्कलकुवा ! Akkalkuwa/ SKpublicvoice
प्रतिनिधि/अल्ताफ मलकानी
अक्कलकुवा तालुक्यातील (ता.१८) रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खापर येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण जागेच्या मतदान यंत्रामधील पेपर सरकल्याने राज्य निवडणूक आयोगाने (ता.२२) रोजी फेरमतदान प्रक्रिया सकाळी ०७ ते ०५.३० दुपारी पर्यंत पार पडली.यात ग्रामपंचायत परिवर्तन पेनलच्या शोएब तेलीने ४१२ मत
मिळवून सबका साथ सबका विकास पेनलच्या आलमगीर बलोचला १५ मतांनी पराभूत केलेआलमगीर बलोच यांना ३९७ मते मिळाली.फेरमतदाना नंतर सबका साथ सबका विकास पेनेलच्या खात्याला ११ सदस्य निवडली आहे तर ग्रामविकास परिवर्तन पेनेलच्या खात्याला ६ सदस्य निवडून आली आहे.
प्रभाग क्र. ३ मध्ये भाग अ ६४७ व ब ६४५ असे एकूण १२९२ मतदाते आहेत,त्यात ८१९ मतदात्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बाजवला आहे.झालेल्या फेरमतदाना नंतर सबका साथ सबका विकास पेनेल मधील लोकनियुक्त सरपंच किरण जयसिंग पाडवी यांच्यासह जैन ललिताबाई निलेश,वसावे देविदास जयसिंग,पवार प्रमिला छगन,पाडवी आशा विनायक,चौधरी वंदनाबाई दीपक,वसावे दक्षा देवेंद्रकुमार,पाडवी अंजना रोहिदास,कामे कविता विनोद,पाडवी संगीता किरण,कामे विनोद यशवंत,पाडवी अंजना विजय असे एकूण अकरा सदस्य निवडून आले आहेत तर ग्रामविकास परिवर्तन पेनल मधील जाट ललित जगदीश,पाडवी अश्विन कृष्णा,पाडवी करुणा वासुदेव,पाडवी महेश चंदू,सदाराव प्रमिलाबाई शांतीलाल,तेली शोएब रशीद असे एकूण सहा सदस्य निवडून आले आहे.
फेरमतदानात मिळालेली मते अशी
तेली शोएब रशीद:४१२
बलोच आलमगीर सत्तार:३९७
नोटा:१०
🟤🟣🔴🟡⚫🟠🔵⚪🟢🟤🟣🔴🟡⚫


