एड्स जनजागृती घडवल्याने जिल्ह्यामध्ये एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत दिलासादायक घट झाली.



 नंदुरबार ! Nandurbar /SKpublicvoice 

          नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार ६०० एचआयव्ही बाधित असून त्यांच्यावर मोफत तपासणी, उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे तसेच या संदर्भात विविध माध्यमांद्वारे माेठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झाली आहे. नागरिकांमध्ये जागरूकताही वाढली आहे. २०२१ मध्ये ५२ हजार ८४७ सामान्य नागरिकांची तपासणी करण्यात आली हाेती. त्यात १७१ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळले हाेते. तर यंदा मात्र एचआयव्ही बाधितांच्या संख्येत घट झाली असून आतापर्यंत केवळ १२४ बाधित रुग्ण आढळले, ही समाधानाची बाब ठरली आहे.

     एचआयव्ही होऊ नये, त्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत जिल्हाभरात २२ महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत असून ११६ युनिटमधून मोफत तपासणी करण्यात येत आहे. एचआयव्ही या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवण्यात जिल्ह्यातील प्रशासनाला यश मिळाले असून दिवसेंदिवस एचआयव्ही बाधितांची संख्या घटत चालली आहे. दरवर्षी सामान्य रुग्णांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर एचआयव्हीचा रुग्ण आढळलाच तर त्याचे समुपदेशन करण्यात येते. दुसऱ्या व तिसऱ्या तपासण्या करण्यात येतात.

     तसेच त्याला नियमित औषधोपचार घेण्यास बाध्य केले जाते. जिल्ह्यात आजघडीला एचआयव्हीचे पाच हजार ६०० रुग्ण नियमित औषधोपचार घेत असून ते सामान्य जीवन जगत आहेत. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळत असून व्यक्ती स्वत: तपासणीसाठी आता पुढे येऊ लागल्या आहेत. हा जनजागृती झाल्याचाच परिणाम आहे.


१३ बालके निगेटिव्ह; कमी प्रमाण दिलासादायक
गत वर्षी १८ गरोदर माता एचआयव्ही बाधित होत्या. तर यंदा केवळ १२ गरोदर माता बाधित आढळल्या. यंदा १४ गरोदर मातांनी मुलांना जन्म दिला. त्यातील १३ बालके निगेटिव्ह तर केवळ एक बाळ पॉझिटिव्ह आढळले. बाधित आढळल्यास त्याचे नाव गुप्त ठेवले जाते. -डॉ.नितीन मंडलिक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post