खामला येथे दीड लाखांचा गांजा जप्त, एकास अटक.

खामला येथे दीड लाखांचा गांजा जप्त ; एकास अटक

मोलगी |  MOLAGI/SKpublicvoice 

खामला ता.धडगाव  येथील एका इसमाच्या घरात १ लाख् ५२ हजार १४५ रुपये किमतीचा १४ किलो ४९० ग्रॅम गांजा पोलीसांनी  हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.दि.१ डिसेंबर रोजी धडगाव येथील पोलीस निरीक्षक आय.एन.पठाण यांना इसम पारशा कोंडया पराडके (रा.खामला ता.धडगाव) हा त्याच्या घरात बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारे गुंगीकारक गांजा हा अंमली पदार्थाची विक्री करीत आहे अशी गुप्त बातमी मिळाली.

श्री.पठाण यांनी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारशा कोंडया पराडके याच्या घरात छापा टाकला.

त्याच्या घरात १ लाख ५२ हजार १४५ रुपये किंमतीचा १४ किलो ४९० ग्रॅम इतका वजनाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा आढळून आला. त्याला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पी.आर. पाटील, निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत घुमरे, आय.एन.पठाण, उपनिरीक्षक प्रविण महाले, पोहेकॉ राजेंद्र जाधव, जयेश गावीत, स्वप्निल गोसावी, पोना शशिकांत वसईकर, रितेश शांताराम बेलेकर, गणेश रमेश मराठे, पोकॉ विकास अशोक चौधरी, विनोद पांडुरंग पाटील, जितेंद्र मुरलीधर सांगळे, राजेश्वर सायबू भुसलवाड, राजेश गोकुळ तिरकाडे यांच्या पथकाने केली.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post