नवापूर येथे मंदिरात चोरी करणार्‍या चोरटयास रंगेहाथ पकडले.



नवापूर येथे मंदिरात चोरी करणार्‍या चोरटयास रंगेहाथ पकडले
ग्रामस्थांनी चोप देवून केले पोलीसांच्या स्वाधीन

नवापूर | NAVAPUR / SKpublicvoice 

      

नवापूर शहरातील नवीन महादेव मंदिरात  चोरी करणार्‍या चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. नागरिकांनी त्याला चोप देवून पोलीसांच्या  स्वाधीन केले.

       दि.२ डिसेंबर रोजी एक भिक्षुकाच्या वेशात असलेल्या चोरट्याने नवीन महादेव मंदिरातील दान पेटी असलेला डब्बा लंपास केला होता. सदर चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती.

      फुटेज पाहून मंदिर परिसरातील नागरिक सकाळी चोरट्याच्या शोधात होते. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान पुन्हा चोरट्याने मंदिरात प्रवेश करताच स्थानिक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडले. स्थानिकांचा रोष बघता चोरट्याला चांगलाच चोप देण्यात आला व पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹


🔵🟤🟠🔴🟣⚫⚪🟡🟢🟤🟠🔴⚫🟣

    Thanks 👍 for your SKpublicvoice watching and sharing with you 🙏

Post a Comment

Previous Post Next Post