शहादा ! Shahada/SKpublicvoice
शहादा शहरातील तापी रेसिडेन्सी परिसरात ह भ प अविनाश महाराज यांचे भागवत सुरू आहे त्यांच्या मधुर वाणीतून भागवत सप्ताह दोन डिसेंबर पासून ते नऊ डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. सध्याचे युग धावपळीचे युग झालेले आहे. प्रत्येकाला अल्पावधीत सर्व सुख सोई या वेळेवर व जागेवरच पाहिजे आहेत. सात्विक आहार हा नष्ट होत चालला आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया दळण घरीच करत असायच्या. आता सर्व तयार मिळते व तेही पिशवीत बंदिस्त येत. आताची पिढी ही फास्ट फूड कडे वळली आहे. कोणालाच कोणाला वेळ देण्याची गरज भासत नाही प्रत्येक जण हा मोबाईल मध्ये व्यस्त असलेला पाहावयास मिळतो. त्यामुळे कुटुंबाची ध्रुवीकरण सुरू झाले आहे.
जीवन जगताना नीतीने, समाजात वावरताना रीतीने तर बोलताना प्रीतीने वागालात तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मुलांना चांगले संस्कार हे आई-वडील व शिक्षकच देऊ शकतात. गुरु प्राप्त झाला तर भगवंत प्राप्ती होते. सत्संगामुळे व भागवतामुळे सुख, समाधान ,आनंद व शांती प्राप्त होते. त्यामुळे संस्कार देताना सोबत सत्संगाची पण गरज महत्वाची आहे. ज्यांच्याकडे सत्संग होते भागवत होते ती लोक भाग्यवान असतात. दररोज जवळपास तीन तास चालत असलेल्या भागवत कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत शिवाय अधून मधून गात असलेल्या भक्ती गीताने महिलावर्ग तल्लीन होऊन नाचण्याच्या आनंद देखील घेताना दिसतात.
कृष्णजन्म सहा डिसेंबर रोजी अजित करण्यात आलेला असून त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्रीमती मंगलाबाई दिलीप साळी, प्रकाश साळी , राजेंद्र साळी ,जयेश साळी यांच्यातर्फे करण्यात आले आहे
🔴🟠🟤🟣🔵🟢⚫⚪🟡⚪⚫🟣🔴🟠
🔹🔷✍️📹 SKpublicvoice 📺✍️🔷🔹
Thanks 🙏for your watching and sharing with you 🙏
Tags
भागवत कथा.