शहादा ! Shahada/SKpublicvoice
प्रतिनिधी/ शाहिद शहा
आज दिनांक 28/12/2022 बुधवार रोजी सुफ्फा व इकरा उर्दू शाळेत क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रफीक शेख नुरा ( उपाध्यक्ष, मुत्तहीद मुस्लीम जमात , शहादा ) हे होते . क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन मा. फिरोज भाई कुरेशी (Government contractor ) यांच्या हस्ते झंडा दाखवून करण्यात आले .
संस्थेचे अध्यक्ष मा. मुन्ना भाई कादरी यांनी मानवी जीवनात शिक्षणा इतपतच क्रिडेचे सुद्धा महत्व आहे. तसेच क्रिडेनेच शारिरीक व मानसिक विकास साध्य होते असे वक्तव्य केले.
या क्रिडा स्पर्धेत रनिंग, स्लो सायकलिंग, बुकबॅलन्स, म्युझीक चेअर, लेमन स्पून ई. खेळांचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात संचालक मंडळ मा. तनवीर भाई बोरदवाला मा. ईश्वर भाऊ पाटील मा. डॉ. नाजीम भाई तेली मा. जाकीर भाई मनियार मा. सुरेश भाऊ चव्हान मा. सकलैन भाई नुरानी मा. मोहसीन भाई कुरेशी व सुफ्फा शाळेचे मुख्याध्यापक मा. जव्वाद अली तसेच इकरा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमरुन्नीसा मॅडम यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा. रिजवान सर अन्सारी यांनी केले.