साक्री शहरातील सि.गो.पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती दिवस साजरा करण्यात आला.



साक्री !Sakri/SKpublicvoice

           साक्री प्रतिनिधी/अकील शहा 
             मो.9970861809

        साक्री : विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय साक्री जि. धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि ग्रामीण रुग्णालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने 01 डिसेंबर जागतिक एड्स जनजागृती दिवस साजरा करण्यात आला.

      
      यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक श्री योगेश नांद्रे यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही एड्स विषयी मार्गदर्शन केले आणि त्याविषयी शपथ दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. आर. अहिरे यांनी एड्स विषयी समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले आणि एच आय व्ही एड्स जनजागृतीपर रॅली ला संबोधित केले.

      
       महाविद्यालयात रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेमध्ये दिव्या भामटे चा प्रथम क्रमांक आला तर कोमल भोसले चा द्वितीय क्रमांक आला. पोस्टर स्पर्धेतील ऋतुजा चव्हाण आणि कल्याणी भामरे यांचा प्रथम क्रमांक आला. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. पी. पाटील, रासेयो सल्लागार प्रा. विश्वास भामरे, प्रा. खैरनार मॅडम, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेंद्रसिंग मगर आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप राठोड यांनी केले.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹


       जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
          मुख्य संचालक:- श्री. सईद कुरेशी 
               📱95 29 25 53 54


    Thanks 👍 for your SKpublicvoice         watching and sharing with you .🙏

Post a Comment

Previous Post Next Post