आई म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन व भागवत सप्ताहात कृष्णजन्म साजरा.

 
शहादा ! Shahada/SKpublicvoice

 
     एकमेव भागवत  ग्रंथ हा धर्म सांगतो. भगवंताला देखील जन्म घेताना सामान्य माणसासारखं जन्माला यावं लागलं याचे एकमेव उदाहरण म्हणजे भागवत कथेतील कृष्ण जन्म होय. असे प्रतिपादन ह भ प खगेंद्र जी महाराज यांनी आई माळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित भागवत सप्ताहात कृष्णजन्म साजरा करताना म्हटले.
      

     रामाच्या अवतार हा पूर्ण अवतार आहे पण तो मर्यादा पुरुषोत्तम आहे . प्रत्येक बाबतीत रामाला मर्यादा आहेत. वाल्मिकी ऋषींनी रामायणात जे लिहिले तेच रामाने केले. तर कृष्णाच्या उतारा पूर्ण पूर्ण अवतार आहे. याचाच अर्थ कृष्णाने गोपींचे वस्त्र पळविले तर द्रौपदीच्या पदर खाली पडू दिला नाही. लोकांच्या जीव वाचविण्यासाठी कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला तर धर्मवाचविण्यासाठी महाभारत घडविले. भागवत शब्दाचा चौथा दिवस हा कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संगीतमय वातावरणात वासुदेवाने कृष्णाला टोपलीतून सभा मंडपात प्रवेश करतानाचां सजीव देखाव्यांनी  संपूर्ण सभा मंडप भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन नाचत होते तर संगीताच्या तालावर स्त्री पुरुष ठेका घेत होते.
      
    महाराज पुढे बोलताना म्हणाले शहरातील मुलांना वाढदिवसांनी बिघडवला आहे तर खेड्यातील मुलांना वरातींनी बिघडविले आहे. आणि म्हणून आजच्या भारतातील नागरिकांनी संस्कृती टिकवायची असेल तर घरातील मुलांना संस्कार देणे गरजेचे आहे थोडा मोठ्यांच्या आशीर्वाद आवश्यक आहे आणि यासाठी अशा भागवत कथेचे नियोजन हे संस्कार टिकवण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करतात.  कृष्णाचा दही हंडी फोडताणाचां सजीव देखावा ही साजरा करण्यात आला. आनंद भयो... या महाराजाचा भक्तीमय गीताने गरबा व ठेका घेत संपूर्ण सभा मंडप तल्लीन झाले होते. म्हाळसा नगर हे पूर्णतः भक्तीमय झाले आहे. 
        
    कृष्ण जन्माचे ओचीत्य साधून आई म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात  रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    सुरुवातीला रक्तदान शिबिराचे उद्घाटन समाजसेवी दिलीप जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले, डॉक्टर स्मिता जैन, काही म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष (उबाठा) सागर चौधरी, जायंट ग्रुपचे अध्यक्ष सतीश जव्हेरी, संकल्प ग्रुपचे डॉक्टर लक्ष्मण सोनार, राकेश जैन, प्रशांत कदम ,सुरेश चव्हाण पत्रकार मनोज बिरारी, राजू मंसुरी सह मान्यवर उपस्थित होते. रक्तदान करतेवेळी नवजीवन ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले . रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अडीचशे ग्रॅम बदाम चे वाटप करण्यात आले.

   भंडारा प्रसाद दिनांक 31 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सर्वांनी भंडारा प्रसादाच्या लाभ घेण्याचे आवाहन आई म्हाळसादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे सह सर्व सभासदांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post