नवापूर ,अटक करण्यात आलेले पाच आरोपी लॉकअप तोडून फरार.


एकास गुजरात पोलीसांनी पकडले, सीमावर्ती भागात नाकाबंदी
नवापूर : अटक करण्यात आलेले पाच आरोपी लॉकअप तोडून फरार

नवापूर | NAVAPUR/SKpublicvoice 

       नवापूर पोलीस  ठाण्याच्या लॉकअपमध्ये  अटकेत असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी लॉकअपच्या खिडक्या तोडून फरार झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एकास गुजरात पोलीसांनी पकडले आहे. घटनेच्या पार्श्‍वभुमीवर दोन्ही राज्याच्या सिमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली .याबाबत उपलब्ध माहितीनुसार नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना आज दि.५ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अटक करुन पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

      मात्र लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेली खिडकी तोडून आरोपी फरार झालेे. नवापूर पोलीस ठाण्याची लॉकअप असलेली इमारत ब्रिटिशकालीन आहे. खिडकीतून उड्या मारत चड्डी बनीयन वरच पोबारा करत हे आरोपी ऊसांच्या शेतामध्ये फरार झाल्याचे समजते.

     दरम्यान यापैकी एकास व्यारा येथील पोलीसांनी पकडले असून उच्छल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र, गुजरात पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.


🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹

Post a Comment

Previous Post Next Post