बांधकाम मजुरांचा पिकअप वाहनाचा ब्रेक फेल होउन खोकसा घाटात भीषण अपघात...




नवापूर !Navapur/SKpublicvoice 
प्रतिनिधी /समीर पठाण



    नवापूर तालुक्यातील नवागाव /खांडेपाडा, बिजादेवी येथील बांधकाम मजूर स्लॅब भरण्यासाठी साक्री तालुक्यातील उंबरफाटा परिसरात गेले होते. रात्री उशिरापर्यंत काम संपल्याने परत येताना 11.00 वाजेच्या दरम्यान खोकसा घाटामध्ये मजुरांचे पिकअप वाहन, मिक्सर मशीन यांच्या अपघात झाला आहे. तीव्र उताराच्या वळण घाट रस्त्यात 30-40 फूट खोल पिकअप ब्रेक फेल होऊन व मिक्सर मशीन कोसळल्याने अनेक मजूर खाली दाबले गेले. यात 2 महीला मजूर जागीच ठार झाले असून, 10 ते 12 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.


अपघात झालेले जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,काल दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी रात्री 11.00 वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर खोकसा गावाचे पोलीस पाटील सुनील गावित व गावकरी यांनी अपघात स्थळी धाव घेऊन मदतीचे कार्य सुरू केले. पोलीस पाटील सुनील गावती यांनी 108 रुग्णवाहिका व विसरवाडी पोलिसांना माहिती देतात ,पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न/मदत कार्य सुरू केले.

जखमींना तात्काळ उपचारासाठी पिंपळनेर येथील 108 रुग्णवाहिका पायलट व डॉक्टर ,विसरवाडी 108 रुग्णवाहिका पायलट सुभाष गावित व डॉक्टर प्रवीण गावित, नवापूर 108 रुग्णवाहिका पायलट विनोद देसाई व डॉक्टर राहुल सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत, जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नंदुरबार येथे पाठवले.

चिंचले  येथील सरपंचाच्या जेसीबीची मदत घेऊन खोकसा ग्रामस्थ व विसरवाडी पोलिसांनी अपघातात वाहनाखाली दाबलेल्या मजुरांना बाहेर काढून मदत रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केली .रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.

विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील ,हेड कॉन्स्टेबल हिंदुस्तान नाईक ,हेड कॉन्स्टेबल हेमंत खाडे ,पोलीस नाईक राजू कोकणी व त्यांचे पथक अपघात स्थळी दाखल झाले होते सदर अपघातात अधिक कार्यवाही विसरवाडी पोलीस करीत आहेत.


जखमी मजुरांची नावे 

1)प्रीतम विक्रम गावित (वय 17) ,
2)सरिता विक्रम गावित (वय 30),
3) संतोष बन्सी गावीत (वय 20),
4)ईश्वर रामदास गावित (वय 30),
5) बन्सी रेवा गावित (वय 58), 
6)अश्विन दिलीप वळवी (वय 30)
 सर्व राहणार नवागाव खांडेपाडा व 
7)किसन सदाशिव सोनवणे (वय 18) ,
8)किस्मत सदाशिव सोनवणे (वय 16) ,
9)निलेश धरमदास देसाई (वय 32) 
सर्व राहणार बिजादेवी तालुका नवापूर हे मजूर जखमी झाले असून ,त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 1)अनिता दिलीप गावित (वय 25) व 2)सुमित्रा मोहन गावित (वय 45) राहणार नवागाव/ खांडेपाडा येथिल या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.



🔵🟢🟤🟠🔴⚪🟡🟣⚫🟤🟢🔵🟠🔴

Post a Comment

Previous Post Next Post