वालंबा येथील विद्यार्थ्याचा शाळे समोरील रस्त्यावर दुचाकीने जबर ठोस...



अक्कलकुवा ! Akkalkuwa/ SKpublicvoice 
प्रतिनिधी /अल्ताफ मलकानी 

                    

      अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय अनुदानित आश्रम शाळा वालंबा येथील विद्यार्थ्याचा शाळे समोरील रस्त्यावर दुचाकीने जबर ठोस दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
                याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत स्थित असलेल्या देव मोगरा पुनर्वसन गावाजवळ अति दुर्गम भागातील वालंबा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळा स्थलांतरित झाली असून या आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा नऊ  वर्षीय विद्यार्थी मदन रमेश पाडवी हा दिनांक 20 डिसेंबर रोजी संध्याकाळचे आपले जेवण आटोपून सुमारे साडेसहा वाजेच्या दरम्यान जवळील रस्त्यावर पायी जात असताना अक्कलकुवा कडून मुलगी कडे जाणाऱ्या भरधाव वेगातील दुचाकी क्रमांक एम एच 39 ए एल 32 82 यावरील दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 39 पी 27 53 हिला ठोस दिल्याने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यावर धडकल्याने या  विद्यार्थ्याला जबर ठोस देऊन गंभीर जखमी केले या विद्यार्थ्याला अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला या विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले मयत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रम शाळा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आपल्या मुलाच्या मृतदेह अंतिम विधीसाठी घेण्यास नकार दिला असता पालकांची समजूत काढून संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला वडील रमेश सिंगा पाडवी यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मुलाच्या अचानकपणे अपघाती मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला होता मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे असून पुढील तपास फौजदार जितेंद्र महाजन करीत आहेत.

     सदर आश्रमशाळा अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याच्या लगत असून या रस्त्यावर मोठी वाहतूक असते यापूर्वी देखील एका विद्यार्थ्याच्या अपघात होऊन पायाला इजा झाली होती काल झालेल्या अपघातात आठ वर्षीय बालकाच्या अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने या आश्रम शाळेला संरक्षण भिंत बांधून विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे अशी संतप्त मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. आश्रमशाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाहक विद्यार्थ्यांच्या जीव गेल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

     माझ्या मुलाचे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर साडेसहा वाजेला रस्त्यावर कसा व का गेला असा प्रश्न उपस्थित करून माझ्या मुलाच्या मृत्यूस शालेय प्रशासन जबाबदार असून यामध्ये जे दोषी असतील त्यांची कसून चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत मुलाचे वडील रमेश सिंगा पाडवी यांनी केली आहे.
 
     ही आश्रम शाळा रस्त्यालगत असून या आश्रम शाळेला संरक्षण भिंत अथवा तारेचे कुंपण नसल्याने मुले सहजपणे रस्त्यावर येत असतात आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना शौचालय तसेच स्नानगृह क्षमतेप्रमाणे नसल्याने विद्यार्थी बाहेर आपली व्यवस्था शोधत असतात अनेकदा रस्ता ओलांडून आपल्या विधीसाठी जात असल्यामुळे दुर्दैवाने अपघात घडत असून या नाहक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागत असल्याने याकडे आश्रम शाळा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पालकांकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post