साक्री ! Sakri / SKpublicvoice
प्रतिनिधी /अकील शहा
साक्री : गावाविकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील तसेच गावातील गोरगरीब जनतेला निवासासाठी घरकुल योजना प्रभाविपने राबवली जाईल, महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता महिला बचत गटांना वेळोवेळी साह्य करून स्वयंपूर्ण केले जाईल असा विश्वास खा. डॉ. हिनाताई गावित यांनी कळंभीर ता. साक्री येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला.
धुळे जि. प. कृषी, पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले. खा. डॉ. गावित, दहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर साक्री च्या नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, सभापती रेखाताई सोनवणे, जयश्री पगारिया, नगरसेविका ऍड.पुनम काकुस्ते-शिंदे, भाजपा पिंपळनेर मंडळाध्यक्ष इंजि. मोहन सूर्यवंशी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता इंजि. के. टी. सूर्यवंशी, महिर चे सरपंच रमेश सरक, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, भाजपा चे तालुका सरचिटणीस प्रदीप नांद्रे,श्री छत्रपती शिवाजी वाचनालय चे सहकार्यवाह विजय भोसले, साक्री तालुका प्रेस क्लब चे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, नगरसेवक दिपक वाघ, प्रविण निकुंभे, म्हसदी चे माजी सरपंच कुंदन देवरे, महेश अहिरराव, मुन्ना देवरे, सराफा व्यापारी दिलीप विसपुते, प्रविण देवरे उपस्थित होते.विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन भरत देवरे, माजी सरपंच तुकाराम ठाकरे, उपसरपंच गिराबाई माळचे, पोलीस पाटील ज्योत्स्ना ठाकरे, विजय ठाकरे, दादाजी ठाकरे, रुपाली पवार, वत्सलाबाई ठाकरे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रितेश उर्फ बंटीदादा ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजपा युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेविका वर्षा देवरे, बापू ठाकरे, निंबा नेरकर, अशोक वाघ, रजेसिंग बापू ,सखूबाई पाटिल, बाईजाबाई सरक, धोंडू थोरत, दशरथ थोरात, देवळेकर बापू, रामभाऊ कुवर, विश्वास वाघ, राजू दाभाडे, साधना नेरकर, अशोक पगारे, सयाबई थोरात, भूषण ठाकरे, जगदिश ठाकरे,अशोक ठाकरे, विनोद तायडे, बाबा शेवाळे,शरद ठाकरे, सुशील देसले, योगी दीनानाथजी महाराज, किशोर ठाकरे, नाना ठाकरे, सुका वाघमोडे, कैलास भिल,शिवदास सोनवणे, राजु भोई, सविता थोरात,रितु ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹
