
शहादा | SHAHADA/SKpublicvoice
एरवी पाण्यात बुडालेल्या मृतदेहाला शोधून बाहेर काढण्यासाठी गोताखोर अथवा पट्टीच्या पोहणार्यांची मदत घेतली जाते. सहसा पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी काढत नाहीत, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.परंतु शहादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी स्वतः १५ ते २० फूट खोल पाण्यात उतरून गोताखोराला सोबत घेऊन एका इसमाच्या मृतदेह बाहेर काढत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले. पाण्यातून स्वतः मृतदेह बाहेर काढणारे श्री. मोरे हे कदाचित पहिलेच अधिकारी असल्याने सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील असलोद दूरक्षेत्रअंतर्गत येणार्याजाम (जवदा) ता.शहादा येथील के.टी.वेअर बंधार्यात दि. ३० नोव्हेंबरला मध्यप्रदेश राज्यातील लालसिंग शिवराम चव्हाण (वय ३५, रा.देवधर ता. पानसेमल,जि.बडवाणी) या व्यक्तीने उडी घेतली.दोन दिवसापासून मृतदेहाची शोध मोहीम सुरू होती. परंतु शर्तीचे प्रयत्न करूनही हाती काहीही मिळत नव्हते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी १५ ते २० फूट पाण्याची खोली होती.परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या सोबत प्रकाशा (ता. शहादा) येथील सीताराम पुंजू भोई यांना बोलावून त्यांच्यासोबत स्वतः ठिकाणी सोबत घेऊन पाण्यात उतरून त्या व्यक्तीला बाहेर काढून आपले कर्तव्य बजावले.
सर्व गावकर्यांनी त्यांचे अभिनंदन केले स्वतः पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढणारे हे पहिलेच अधिकारी असतील, अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त करण्यात येत आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🔹🔷✍️📺 SKpublicvoice 📹✍️🔷🔹
Thanks 👍for your SKpublicvoice News 📰 watching and sharing with you. 🙏
🔴🟠🟡🟢🔵🟣🟤⚫⚪🔴🟠🟡🟢🔵
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क करा.
मुख्य संचालक :- श्री.सईद कुरेशी
📱95 29 25 53 54