नंदुरबार ! Nandurbar/ SKpublicvoice
प्रतिनिधी/नरेश वळवी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
सन 2020-21 व 2021- 22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या बामखेडा तालुका शहादा व श्रीरामपूर तालुका नंदुरबार या ग्रामपंचायतीची विभागीय स्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व सण 2021-22 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली होती.
या तपासणी जिल्हा स्तरावर बामखेडा तालुका शहादा व श्रीरामपूर तालुका जिल्हा नंदुरबार यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय क्रमांक मिळाले आहे. जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतची निवड विभाग स्तरावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे करता करण्यात येते.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021- 22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरिता जिल्ह्यातील श्रीरामपूर व बामखेडा यांची निवड करण्यात आली आहे .या ग्रामपंचायतीचे विभागीय आयुक्त कार्यालयाचे नाशिक उप आयुक्त (विकास), मनोजकुमार चौधर यांच्या अध्यक्षतेखालील त्री सदस्य समितीने तपासणी केली. यात विस्तार अधिकारी अनिल राणे ,दीपक मोरे यांचा समावेश होता.
यावेळी समितीचे प्रारंभी श्रीरामपूर येथे ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने स्वागत केले .यानंतर समिती अध्यक्ष मनोजकुमार चौधर याने ग्रामस्थांची संवाद साधून ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. ग्रामस्थांचे अधिकार , ग्रामपंचायतीला कशाप्रकारे योजना वर्ग होतात, स्थानिक प्रशासनाने कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या, अशा अनेक विषयांवर आढावा घेण्यात आला.यानंतर समितीने जि.प.शाळा ,अंगणवाडी ,
सखी प्रेरणा भवन स्टेशन, फुलपाखरू गार्डन, पिण्याचे पाण्याचे स्रोत, गोबर गॅस ,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभुमी आदी कामांची पाहणी केली .यानंतर बामखेडा तालुका शहादा येथे ही समिती ने भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र पाटील ,प्रकल्प संचालक (जलजीवन मिशन) तथा गटविकास अधिकारी जयवंत उगले, शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे ,
पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील पाटील ,उप अभियंता पांडुरंग दरेवार, मराठे, विस्तार अधिकारी मनोज देव भैय्यासाहेब निकुंभ, अरुण वरसाडे ,अभियंता हरीश भोई, महेंद्र नाईक श्रीरामपूर चे सरपंच यशवंत गांगुर्डे ग्रामसेविका , उपसरपंच निलेश अहिरे, पत्रकार सईद कुरेशी, जि. प. मुख्याध्यापक भिका सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता दिलवर अहिरे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचत गट महिला, पोलिस पाटील विश्वास गायकवाड, तंटामुक्त समिती, निगराणी समिती, शालेय समिती, फिनिश सोसायटी, ग्रामपंचायत शिपाई , आजी -माजी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी ,कर्मचारी व सदस्य,
आदीसह ग्रामस्थ पदाधिकारी व सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
🌀🔷🟡🌀🔷🔴🌀🔷🟣🌀🔷🟤🌀🟢